उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूरच्या वतीने माहे फेब्रु. / मार्च २०१३ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १० वी प्रमाणपत्र परिक्षेचे नियमित, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र व प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य शूक्रवार दि. ८ फेब्रुवारी  रोजी जिल्हा परिषद (कन्या) प्रशाला, उस्मानाबाद येथे  वितरीत करण्यात येणार आहे.
         संबंधितानी साहित्य स्वीकारण्यासाठी आपला  प्रतिनिधीस अधिकारपत्रासह विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र व प्रात्यक्षिके परीक्षेचे साहित्य स्वीकारण्यासाठी पाठवावेत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१३ करीता केंद्र संचालकांच्या बैठका येथील श्रीपतराव भोसले हायस्कुल, उस्मानाबाद  येथे दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. संबधितानी नोंद घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे सचिवांनी कळविले आहे.
 
Top