उस्मानाबाद :- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गाई-म्हशीसाठी कृत्रिम रेतन सुविधा शेतक-यांच्या दारात उपलब्ध होणार आहे. ही सुविधा जिल्हयात 125 कृत्रिम रेतन केंद्राव्दारे पुरविण्यात येणार असून सेवादात्यांची निवड करुन गरजेप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पशुपाल्यांना आपल्या पशुधनासाठी वेळेवर पशवैद्यकिय सेवा, कृत्रिमरेतन  सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे पशुपालकांच्या जनावरांत अनुवांषीक सुधारणा होवून दर्जेदार पशुधन निर्मिती होण्यास मदत होईल, अशी माहिती तुळजापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी  डॉ.परंडकर यांनी दिली आहे.
 
Top