उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व माजी सैनिक दरमहा बॅंकेतून निवृत्ती घेत आहेत. त्यांना १ जानेवारी २००६ पासून ६ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन मिळत आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन सेलची स्थापना करण्यात आली आहे.
सर्व निवृत्तीवेतन धारक माजी सैनिक, विधवा निवृत्ती वेतनधारकाची माहिती सेलला पाठवायाची असल्याने निवृत्ती वेतनधारकानी आपली माहिती विहीत नमुन्यात भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावयाची आहे. अधिक माहिती व फॉर्मसाठी संबधितांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.