उस्मानाबाद -: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्यावतीने उस्मानाबाद तालुक्यातील काजळा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात विधी साक्षरता शिबीर घेण्यात आले. त्यात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांचे हक्क, संगोपन, शैक्षणिक अधिकार, बालविवाह या विषयावर न्या. ओंकार देशमुख, आय. एम. नाईकवाडी आणि अँड. व्ही. पी डोके यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. अँड. वैशाली देशमुख यांनी वरिष्ठ, जेष्ठ नागरीकांचे अधिकाराविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक निवाशी न्यायाधिश, वरिष्ठस्तर सी. पी. गड्डम यांनी केले. या कार्यक्रंमाला उस्मानाबादच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी ग्रामस्थांनी कायदेविषयक साक्षरता शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले व ग्रामस्थांचे कौतुक करुन सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञाचे आभार मानले.
अध्यक्षीय समारोपात तदर्थ जिल्हा न्यायाधिश, एम. बी. दात्ये, यांनी सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन करुन कायदेविषयक शिबीराचे महत्व पटवून दिले. येत्या ३ मार्चला महा- लोकअदालत आयोजित करण्यात येणार या महा लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले प्रलंबित असलेले खटले मिटवून घेण्याचे आवाहन केले. अँड. प्रतिमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर अँड. शिरीष देशपांडे यांचे आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.