लखनऊ/नवी दिल्ली :- अलाहाबादेत रविवारी दोन ठिकाणी चेंगराचेंगरीतील मृतांची संख्‍या ३६ वर गेली आहे. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर सायंकाळी ६.३० वाजता चेंगराचेंगरी झाली. यात १८ जण ठार झाले होते. या दुर्घटनेला रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी पुष्टी दिली. तत्पूर्वी कुंभनगरीत सेक्टर १२ मध्ये चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतकांमध्‍ये १६ महिलांचा समावेश आहे. रेल्‍वे स्‍थानकावर झालेल्‍या घटनेच्‍या चौकशीचे आदेश रेल्‍वेमंत्र्यांनी दिले आहेत.
        मौनी अमावास्येनिमित्त कुंभमेळ्यात ३ कोटींवर भाविक संगमावर पवित्र स्नानासाठी आले होते. परतताना रेल्वे स्टेशनवरही प्रचंड गर्दी झाली. ओव्हरब्रिजवर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे उडालेल्या गोंधळानंतर ब्रिजची रेलिंग तुटली. अनेक लोक खाली पडले. काही खाली उभ्या रेल्वेच्या छतावर पडले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
         दरम्यान, कुंभनगरीत सेक्टर १२ मध्ये गॅस सिलिंडर पेटल्याने गोंधळ उडाला. या वेळी चेंगराचेंगरीत वाराणसीची एक महिला आणि प. बंगालच्या वृद्धाचा मृत्यू झाला.

*
 
Top