बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील ह.भ.प.सौरभ मोरे यांचे वडील दत्तात्रय मोरे यांनी मिरची कांडप मशीनपासून होणार्या ध्वनीप्रदुषण विरोधात नगरपालिकेसमोर उपोषण सुरु केले आहे. यासाठी त्यांचे हे दुसर्यांदा उपोषण सुरु आहे.
सदरच्या मिरची कांडपचे संबंधित मालक हे वाणी प्लॉट, सुभाष नगर येथे सदरची मिरची कांडप मशीन सुरु केली आहे. यापूर्वी दि. २० डिसेंबर रोजी मोरे यांनी उपोषण सुरु केले होते. त्यावेळी संबंधितांनी ध्वनीप्रदुषणाचा अहवाल येईपर्यंत मशीनरी बंद करण्याचे नगरपालिकेस लेखी आश्वासन दिले होते. अहवालात आवाजाची तीव्रता असल्याने बंद करणे भाग होते असे निष्पन्न झाल्याने नगरपालिकेने लेखी कळवून सदरची मिरची कांडप मशीनरी बंद करण्याचे सांगूनही संबंधिताने आपला व्यवसाय सुरु ठेवल्याने मोरे यांनी पुन्हा लेखी कळवून उपोषण सुरु केले आहे. सदरच्या बाबत निवासी उपिजल्हाधिकारी सोमण यांना अखिल भारतीय वारकरी मंडळानेही विनंती केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना प्रत्यक्ष भेटूनही सदरची घटना सांगत मोरे यांनी आपली तक्रार दिली आहे.
दत्तात्रय मोरे यांनी याबाबत बोलतांना सध्या अत्याधुनिक मिरची कांडप मिशन बाजारात उपलब्ध असून त्याच्या आवाजाची तीव्रता अत्यंत कमी असल्याचे सांगत मिशनची किंमतही अत्यंत कमी असल्याने या मिशनचा वापर संबंधितांने केला तर कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. नगरपालिकेने देखील त्यांना याबाबत प्रत्यक्ष कळिवल्यास व अंमलबजावणी केल्यास सनदशीर मार्ग निघेल, असे म्हटले आहे.