कळंब -: पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्‍यासह अनेक प्रमुख मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेच्या कळंब शाखेचा शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता भव्‍य उद्घाटन सोहळा आयोजित करण्‍यात आल्‍याची माहिती बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले.
     अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेने सहकार क्षेत्रात अल्पावधीतच जनतेचा विश्‍वास संपादन करून आपली ओळख निर्माण केली आहे. रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील बँकेला मिळणारा सततचा ऑडीट-‘अ‘ वर्ग लक्षात घेऊन उदगीर, कळंब, औसा, माजलगाव, जामखेड, गेवराई, या सहा नव्या शाखा सुरू करण्याची परवानगी मिळाल्‍याचे सांगितले.  कळंबमध्‍ये शुक्रवार रोजी राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, ह.भ.प.प्रकाश ङ्कहाराज बोधले, आमदार ओमराजे निंबाळकर, आ. राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष शिवाजी कापसे, सभापती लक्ष्‍मणराव थोरबोले, रमेशराव आडसकर, डॉ.अशोकराव मोहेकर, श्रीधर भवर, उमेश कुलकर्णी, पांडूरंग कुंभार, विनयचंद बलाई, शशीकांत फाटक, सलीमभाई मिर्झा आदींच्या उपस्थितीत या बँकेच्‍या शाखेचे उद्घाटन होत आहे. या बँकेकडे विविध कर्ज योजना, सेफ डिपॉझिट लॉकर्स, ठेवीवर विमा संरक्षण सुविधा तसेच ऑनलाइन, इंटरनेट बँकिंग, आकर्षक धनवृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक व सहकारी संस्थांसाठी अर्धा टक्के जादा व्याजदर तसेच एटीएम सुविधेसहीत लोकोपयोगी योजना असल्याचे बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी माहिती दिली.

 
Top