उस्मानाबाद -: शेतीपुरक व्यवसायासाठी शेतीपुरक कौशल्य विकासासाठी जिल्हयात आत्माअंतर्गत ४० शेती शाळांचे  आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक व्ही. डी. लोखंडे यांनी दिली आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत नूकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
      या कार्यशाळेस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. चोले, श्री. हिरेमठ, कृषी विज्ञान केंद्राचे  चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, सर्व कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक, विषयतज्ज्ञ, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
      शेती शाळेत व्यवसायाची निवड करणे, तज्ज्ञ प्रशिक्षक, शेतकरी, सुलभकर्ता यांची निवड करण्याच्या सूचना दिल्या व प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरुन तालुका कृषि अधिकारी संलग्न विभागाच्या प्रतिनिधिंना पाठवण्याचे आवाहन केले
.
 
Top