उस्मानाबाद -: केंद्र शासनाच्या मुरघास योजनेअंतर्गत मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करुन त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील ९४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून पशुपालकांना मुरघास तयार करण्याचे प्रशिक्षण देवून १०० टक्के अनुदानावर मुरघास कोठीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती तुळजापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. परंडकर यांनी दिली.
सध्या जिल्हयात चाराटंचाई असल्याने मुरघास अत्यंत उपयोगी पडणारे सकस आहार असून त्यामुळे पशुधनास नवसंजिवनी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मुरघास बनविण्याच्या प्रक्रियेसाठी शेतातील ओली मका, ज्वारी, बाजरी, लुसर्ण या प्रकारच्या उपलब्ध चाऱ्यांची कुटी करुन मुरघास कोठीमध्ये भरुन ठेवल्यास त्यांचा वर्षभर उत्तम प्रतीचा सकस चारा दुभत्या जनावरांना पुरवठा करुन दुग्धोत्पादनात वाढ करणे शक्य होणार आहे. यामुळे चांगल्या चा-याची नासाडी टळणार आहे.
मुरघास योजनेसाठी तुळजापूर तालुक्यातील शालूबाई वाघमारे यांची निवड करुन त्यांना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते मंजूरी पत्रही देण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ एस.एस.भोसले, डॉ. मिनीयार, पशुधन विकास अधिकारी डॉ. परंडकर व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.