उस्मानाबाद -: सध्या जिल्हयात काही ठिकाणी चाऱ्याची टंचाई असून अशा परिस्थितीत शेतक-यांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, जे चारा उत्पादन करु इच्छितात तसेच ज्यांच्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी चारा उत्पादनाचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
चारा पिकाचे संकरीत मका, कडवळ ज्वारी, आफ्रीकन टॉलची बियाणे शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात येईल, परंतु उत्पादीत केलेला चारा शेतक-यांनी प्राधान्याने जनावरांच्या छावणीस विकणे बंधनकारक राहणार आहे. ज्या शेतक-यांकडे चारा पिकाचे किमान १ एकर ०.४० हेक्टर व जास्तीत जास्त 5 एकर क्षेत्र्असेल अशा शेतकऱ्यांनी गावातील कृषि सहायक, कषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन किती क्षेत्रावर चारा पिकाचे उत्पादन घेवू इच्छितात याबाबतचा अर्ज भरुन दिल्यास त्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा याचा लाभ घेवून टंचाई परिस्थितीत चारा पिकाचे उत्पादन घ्यावे.