बार्शी -: येथील एका मराठी शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणार्या एका बालिकेचे दमदाटी करुन एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार बार्शी पोलिसांत पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन पोलिसानी एकास ताब्यात घेतले आहे.
हरिदास मस्के (रा. भिमनगर, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित बालिकेने दिलेल्या माहितीवरुन आणखी काही मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील शाळेत आरोपी आपल्या नातवाला सोडण्यासाठी व परत आणण्याच्या नावाखाली दररोज हेलपाटे मारत असे. शाळेतील वेळापत्रकानुसार लक्ष ठेवून जास्त कोणाचे लक्ष नसलेल्या ठिकाणी मुलींना अडवून हा दमदाटी करुन विनयभंग करीत असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून काही मुलींना अडवून छळ करुन कोणालाही काहीही सांगू नये, याकरीता दमदाटी केल्याचे बोलले जात आहे. या घटनेतील पीडित मुलीने घरी गेल्यानंतर तिच्या आईस संबंधित घटनेची माहिती दिल्याने मुलीच्या पालकानी तात्काळ शाळेच्या संस्थाचालकासमोर या घटनेची माहिती देऊन जाब विचारला. त्यानंतर ही घटना पोलिसांना कळविण्यात आली. सदरच्या घटनेमुळे आमच्या शाळेची बदनामी होईल असे उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पालकांनी आग्रही भूमिका घेतल्याने प्रकरण तापले. यावेळी संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत तक्रार दाखल करण्यास संमती दिली. यातील वरील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील शोषित मुलींची वैद्यिकय तपासणी करुन सदरच्या घटनेची रितसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत भा.दं.वि. ३५४, ५०४ व द प्रोटेक्श ऑफ चिल्डेन्स फॉर्म सेक्स्युअल ऑफेन्स अँट २०१२ चे कलम ७ नुसार गुन्हा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सौ. सुरेखा धस या करित आहेत.