मुंबई :- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मंगळवार १२ फेब्रुवारी रोजी मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार असून ते दुष्काळी भागांना भेटी देतील व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी या गावी आगमन होईल. त्याठिकाणी असलेल्या जनावरांच्या छावणीस भेट देऊन ते शेतकरी व ग्रामस्थांसमवेत चर्चा करतील तसेच दुष्काळी कामांची पाहणी करतील. दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री बीड जिल्ह्यातील आष्टी, मुशंदपूर, सिध्दवाडी येथील जनावरांच्या छावण्यांना भेटी देऊन तेथील गावक-यांसमवेत चर्चा करतील तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठयाची पाहणी करतील. दुपारी ३.१५ वाजता बीड जिल्ह्यातील अधिका-यांसमवेत त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळ व पाणी टंचाईबाबतच्या बैठकीला मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील.
मागील वर्षी याच सुमारास मराठवाडयातील ८ जिल्ह्यात मिळून केवळ २ टँकर औरंगाबाद जिल्ह्यातील २ गावांमध्ये सुरु होते. सध्या ७०६ टँकर्स ५०४ गावे व १७० वाड्यांमधून पाणी पुरवठा करीत आहेत. केवळ परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यात टँकर्स सुरु नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यात २०१, जालना जिल्ह्यात १७१, बीड जिल्ह्यात १४१, उस्मानाबाद जिल्ह्यात १५३, तर नांदेड जिल्ह्यात ४० टँकर्स सुरु आहेत.