सांगोला (राजेंद्र यादव) :- पश्‍चिम महाराष्‍ट्रातील शिरभावी पाणी पुरवठा योजना ही सर्वात मोठी योजना म्हणुन ओळखली जाते. बुधवारी सांगोल्याच्या दौर्‍यावरती आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही या योजनेबाबत समाधान व्यक्त केले, परंतु ज्यांच्या कामामुळे पंढरपुरचे पाणी सांगोला तालुक्यातील टोकाच्या गावापर्यंत जाते त्या कामगारांचे मात्र पगाराविना हाल चालु आहेत. कॉंटृक्टबेसवरील या मजुरांना गेल्या पाच महिन्‍यापासुन पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सांगोला तालुक्याची तहान भागवणारे मजुर पगाराविना उपाशी अशी विचित्र अवस्था त्यांची झाली आहे.
    शिरभावी पाणी पुरवठा योजनेर्तगत पंढरपुर येथील कॉंन्टृटरने सांगोला तालुक्यात असणार्‍या सहा ठिकाणच्या मोठ्या टाक्यांसाठी खाजगी मजुरांची नेमणुक केली आहे. त्या मजुरांना दरमहा  ३५०० रू पगार असुन त्यांच्याकडुन बर्‍याच वेळा चोवीस तास काम करून घेतले जाते. फिल्टर साफ करणे, लिकेज काढणे, वॉश ऑउट करणे, टाकीची देखभाल करणे अशा प्रकारची कामे त्यांच्याकडुन करून घेतली जातात. कोळा, कटफळ, वाणी-चिंचाळे, बुरलेवाडी, मानेगाव व पंढरपुर अशा ठिकाणी मोठ्या टाक्या आहेत. त्या ठिकाणी २५ ते ३० मजुर कामाला आहेत. दिवस असो किंवा रात्र अधिकार्‍यांचा फोन आला की त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्या ठिकाणी जावे लागते. कधी-कधी एखाद्या ठिकाणी असणारे लिकेज काढताना दोन-दोन दिवस त्या मजुरांना काम करावे लागते. गेल्या पाच महिन्‍यांपासुन या मजुरांना कॉटृक्टरने पगार दिला नसल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सांगोला तालुक्याची तहान भागवणार्‍या मजुरांवरच पगाराअभावी उपाशी राहण्याची वेळ येउ लागली आहे याकडे लोकप्रतिनिधींनी व संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे अन्यथा काम बंद ठेवण्याचा इशारा त्यानी दिला आहे.

      मजुरांना ठेकेदार रामभाऊ कुंभार यांनी पगार का दिला नसल्याचे विचारले असता त्यांनी पाणी पुरवठा योजनेकडुन माझ्या कामाला मुदतवाढ मिळाली नसल्याने त्याचे पगार मी देउ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
Top