उस्मानाबाद -: तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (नळ) शिवारात सुत मिलजवळ अनोळखी इसम  बेवारस अवस्थेत मृत आढळून आला आहे. त्याचे वय अंदाजे ५२ वर्षे, उंची - १६६ से.मी, रंगा-काळा सावळा, चेहरा-गोल, नाक-सरळ, अंगात पांढरा मळकट हॉफ साईज शर्ट, हिरव्या  रंगाची पॅन्ट असा वर्णनाचा इसम  बेवारस  आढळून आला आहे.याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस स्टेशन, तुळजापूरच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top