सोलापूर -: विविध आस्थापनांमध्ये उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये, कार्यालयामध्ये कंत्राटी पध्दतीवर एक किंवा त्यापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेले आहेत. त्या सर्वांनी  मालक म्हणून नोंदी होवून यापुढे सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सांगली या मंडळामार्फत नोंदीत सुरक्षा रक्षक अधिकारी घेणे बंधनकारक आहे. मंडळाचे नोंदीत सुरक्षा रक्षक न घेतल्यास महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायद्याच्या कलमान्वये दंडात्मक न्यायालयीन कारवाई होवू शकते याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
      सदर कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष सांगली जिल्हा सुरक्षा मंडळ , सांगली द्वारा - सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ, प्लॉट नं ४६, पहिली गल्ली, वसंत मार्केट यार्ड, सांगली येथे कार्यरत आहे अधिक माहितीकरिता मंडळाचे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आणि सचिव यांनी केले आहे.
 
Top