उस्मानाबाद : राज्य शासनाच्या एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमातंर्गत सामाजिक न्याय विभागाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती ग्रामीण भागातील  लोकांना होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कलापथकाच्या माध्यमातून तेर येथे कार्यक्रम करण्यात आला.  उपसरपंच दीपक नाईकवाडी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  
    सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित माहिती कलापथकाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी योजना समजावून घेऊन त्याचा लाभ सर्व वंचित घटकांनी घ्यावा, हा यामागील उद्देश आहे.
    याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ सामाजीक न्याय योजना- दिशा विकासाची’ या पुस्तिकेचे वितरण नाईकवाडी  आणि जिल्हा माहिती कार्यालयाचे दुरमुद्रकचालक अशोक माळगे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब कदम, सुमेद वाघमारे, प्रजोत रसाळ, सलीम कोरबू, भगिरथ तापडे, भास्कर माळी, विजयकुमार कांबळे, नरहरी बडवे,गोरख माळी  यांच्यासह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
       निर्मिती लोकनाटय कलापथकाचे प्रमख गौतम माळाळे यांनी महावीर जानराव, अनिल माने, सुरेश  देवकुळे, शशीकांत माने, उत्कर्ष माळाळे आणि श्रीकांत साठे या आपल्या सहकलाकारांसह  कलापथकाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविल्या.
    प्रास्ताविकात माळगे यांनी कला पथक कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका उपस्थितांना समजावून सांगितली.
 
Top