उस्मानाबाद -: सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, उस्मानाबाद येथे सार्वजनिक न्यास संस्थेबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी  येत्या ३ मार्च रोजी महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महालोकअदालतीत ज्या पक्षकार व विधिज्ञांना त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी भाग घ्यावयाचा असेल त्यांनी या कार्यालयास २४ फेब्रुवारीपर्यंत लेखी  स्वरुपात कळवावे, इच्छुकांनी आपले नाव व भ्रमणध्वनी क्रमांकही कळवावेत, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए. टी. मोरे यांनी केले आहे.
 
Top