उस्मानाबाद -: जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने एम. डी. ए. २०१२-१३ या कार्यक्रमांतर्गत जिल्हयात  एक दिवसीय सामुदायीक औषधोपचार मोहिम दि. ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये डी. ई. सी व अल्बेडझॉल गोळ्याचे वाटप करण्यात येणार आहे.  ही मोहिम ग्रामीण भागात ३ दिवस म्हणजे ११ ते १३ फेब्रुवारी  तर शहरी भागात ५ दिवस दि. ११ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.
        या मोहिमेत २ वर्षाखालील बालके, गंभीर आजारी रुग्ण, गरोदर माता वगळून सर्व वयोगटातील लोकांना वयोगटानुसार डी. ई. सी. व अल्बेडझॉल गोळया  आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, स्वयंसेवक समक्ष खाऊ घालणार आहेत. नागरीकांनी  उपाशी पोटी या गोळ्या सेवन करु नये. या गोळया एक दिवस सेवन केल्याने माणसाच्या रक्तातील हत्तीरोगाचे जंतुचे जिवनचक्र नष्ट होते. या गोळया सेवनानंतर कांही त्रास जाणवल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेत औषधोपचार घेण्यात यावा. या मोफत मोहीमेचा सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top