सोलापूर -: जमनालाल बजाज फौंडेशन, मुंबई यांच्यातर्फे देण्यात येणा-या जमनालाल बजाज पुरस्कार, सन २०१३ करीता २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत.
     भारतात व विदेशात गांधीवादी विचारांना अनुसरुन, रचनात्मक कार्य करणा-या व्यक्ती / व्यक्तींना पुरस्कृत करण्यासाठी चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये रचनात्मक कार्याकरीता पुरस्कार. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या व्‍यावहारिक उपयोगाकरीता पुरस्कार. महिला व बाल कल्याण करीता श्रीमती जानकीदेवी बजाज स्मृती पुरस्कार. आंतरराष्ट्रीय पुरस्कार- विदेशात गांधीवादी मूल्यांचा प्रचार केल्याबद्दल पुरस्काराचा समावेश आहे.
    नामांकने सादर करण्यासाठी अर्जदारांच्या सोयीच्या दृष्टीने शासनाचे पत्र व नामांकन फॉर्म, माहिती व निकष यांसह माहितीपत्रक सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये तसेच  जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (सामान्य शाखा) येथे उपलब्ध आहे. दि. १५ ते २८ फेब्रुवारी २०१३ रोजीपर्यंत तहसिल कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सदर नामनिर्देशन फॉर्म स्विकारले जातील. तसेच त्याबाबतची सर्व अनुषंगिक माहिती http//www.jamanalabajajfoundation.org/awards/nominationforms या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top