उस्मानाबाद :- ग्रामपंचायत निवडणूक सन २०१२-१३ मध्ये निवडून आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या जातीचा दावा पडताळणीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‍जिल्हास्तरीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने स्विकारलेले आहेत. प्राप्त प्रस्तावापैकी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये जे मागासवर्गीय उमेदवार निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. अशा प्रस्तावाची छाननी करुन ज्या प्रस्तावामध्ये त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत. अशा उमेदवारांना त्रुटी पुर्तता करण्यासाठी कॅंम्प आयोजित करण्यात आलेला होता. परंतू काही उमेदवारांनी अदयापपर्यंत त्रुटीची पुर्तता केलेली नाही, त्यांच्यासाठी दिनांक २४ फेब्रुवारी २०१३ रोजी (रविवारची सुटी असली तरी)  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत त्रुटीची पुर्तता करणेसाठी कँम्प आयोजीत करण्यात आलेला आहे. तेंव्हा संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेवून त्रुटी पुर्तता शिबीरास हजर रहावे, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा जाती प्रमाणपत्र  पडताळणी समिती, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top