उस्मानाबाद -: ग्रामीण जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ग्रामस्थांची सनद या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत लोकाभिमुख पंचायत प्रशासन दिवस अर्थात ग्रामस्थ दिन सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील ग्रामीण जनतेने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी ग्रामस्थदिनी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहून समक्ष निवेदन सादर करावेत असे कळविण्यात आले आहे. ग्रामस्थ दिनाचा हा उपक्रम दरमहा तिस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो.