नळदुर्ग -: सिंदगाव (ता. तुळजापूर) येथे हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी भीषण अपघातातील चौघा वारक-यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी तुळजापूर, लोहारा, उमरगा, अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावातून प्रतिष्ठित ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथून श्री जय हनुमान भजनी मंडळाची दिंडी माघी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना सोलापूरच्या अलीकडे राष्ट्रीय महामार्गावर मुळेगाव पाटीजवळ दिंडीत भरधाव कार घुसून झालेल्या भीषण अपघातात सहा वारकरी मरण पावले होते. हे सर्वजण तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील चौघे तर वागदरी, शहापूर अनुक्रमे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा वारक-यांचा समावेश आहे. तर अठरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी पहाटे घडली होती. अपघातातील मृतदेहाचे शवविच्छेदन सोलापूर शासकीय रूग्णालयामध्ये करण्यात आले. त्यानंतर सिंदगाव येथे दुपारी चार वाजता श्रीधर ताडकर, उद्धव पाटील बणजगोळे, देविदास बणजगोळे व त्यांची सुविद्या पत्नी जयश्री बणजगोळे या सर्व मयत वारक-यांची एकदाच अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत नंदगाव, घोळसगाव, बोरगाव, आचलेर, कुन्सावळी, आलुर, बोळेगाव, सल्लगरा, नळदुर्ग, जेवळी, उमरगा, लोहारा यासह परिसरातील वारकरी सांप्रदायातील, प्रतिष्ठित ग्रामस्थ, शोकाकुल नातेवाईक सहभागी झाले होते. सिंदगाव येथील स्मशान भूमीत देविदास बणजगोळे व जयश्री बणजगोळे या पती-पत्नीच्या पार्थिवावर एकाच चितेवर तर श्रीधर ताडकर, उद्धव पाटील बणजगोळे या दोघाच्या पार्थिवावर वेगळवेगळ्या चितेवर मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले. ही दुर्दैवी घटना समजताच पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण, शिक्षण महर्षी तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष व्हट्टे, जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, तुळजापूरचे देवानंद रोचकरी, तहसिलदार व्ही.एल. कोळी, नायब तहसिलदार राजेश जाधव, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण यांच्यासह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यानी सिंदगाव येथे भेट देऊन मयत वारक-यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.