उस्‍मानाबाद -: गावपातळीवर जनतेस पिण्याचे शुध्द पाणी व शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने गावपातळीवर गावतळे, साठवण तलावाची कामे भरपूर प्रमाणात घेतली आहेत. यंदाच्या वर्षी  जिल्हयात अपूरा पाऊस झाल्याने तलाव, विहीरी, विंधनविहीरी आटल्याने पाण्याची तीव्रटंचाई भासत आहे.  भविष्यात अशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी आतापासूनच पाणी साठवण्याची सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी  उपाय योजना करणे गरजेचे आहे.  शेतक-यांनी तलावात साचलेला गाळ आपल्या शेतात नेवून टाकून शेती सुपीक, कसदार करुन घ्यावी व शेतीचे उत्पन्न वाढवून आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहन उस्‍मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंडित जोकार, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. बंडगर, यांच्यासह गट विकास अधिकारी तृप्ती ढेरे, पाणी पुरवठा विभागाचे  उप-अभियंता देवकर, डी.आर. राखुंडे, मंडळ कृषी अधिकारी एच.एस. गायकवाड  उपस्थित होते.
      पालकमंत्री मधुकरराव चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, सध्या दुष्काळसदृष्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. पाणीटंचाई निवारणासाठी विंधन विहिरी, रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील कामाचा आराखडा तयार करुन अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा, पाणी टंचाईच्या निवारणासाठी नादुरुस्त नळयोजना  दुरुस्त करा, गावातील नादुरुस्त बोअरची दुरुस्त करा आणि  विंधन विहीरींची कामे तातडीने करावी. कृषी विभागाने शेततळ्याची काम सुरु करुन मागेल त्या मजूरांना रोजगार  उपलब्ध करुन दयावा. भारत निर्माण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल, तात्पूत्या नळ योजनेची कामे सुरु करण्याचे निर्देशन संबंधित यंत्रणेला दिले.
       गावच्या विकासात गावक-यांनीही अडथळे न आणता सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. तरुणानी एकत्र येवून सामाजिक बांधिकीच्या भावनेतून कामे करावीत. चार गावच्या सरपंचांनी एकत्र येवून जनावरांसाठी छावण्या उभारल्यास शासन जनावरांसाठी चारा, पाण्याच्या टाक्या पुरवठा करुन जनावरांसाठी  पाणी पुरविण्याची  सोय शासन करेल, असेही  पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी  सांगितले.

उमरगा-चिवरी गावास पालकमंत्री चव्हाण यांची  भेट

    पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील उमरगा-चिवरी गावासही भेट दिली. पाणीपुरवठा व दुष्काळ निवारण्याबाबतच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी गावक-यांशी संवाद साधला. ग्रामपंचायतीने गावचे रस्ते, नाल्या, विहीर, विंधनविंहीर, हातपंप यासह गावच्या विकासासाठी आवश्यक असणारी योजना तयार करण्याची सूचना दिली. यावेळी सरपंच  बोराडे के. एन यांनी ग्रामस्थांचे अडी-अडचणीचे निवेदन  सादर केले.  ग्रामसेवक एस. बी.  घोडके यांनी  गावातील विकास कामाची सविस्तर माहिती दिली.

येवती  गावास भेट
    पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील येवती या  गावास भेट दिली. त्यावेळी सरपंच दत्तात्रय कांबळे यांनी गावचे अडी-अडचणी निवारण्याबाबत मंत्रीमहोदयांकडे निवेदन दिले. तलाठी सुरवसे व  ग्रामसेवक नवगीरे यांनी गावातील  विहीरी, विंधन विहीरी, गावरस्ता, हातपंप आदि कामाची  माहिती दिली .या गावातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

हिप्परगा ताड गावास भेट

पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील  हिप्परगा ताड या  गावास भेट दिली. त्यावेळी सरपंच अरुण दळवी यांनी पाणीटंचाई निवरण्याबाबत मंत्रीमहोदयांकडे निवेदन निवेदन सादर केले. तलाठी  ए. बी. सुरवसे, ग्रामसेवक घोडके यांनी गावच्या विकास कामे घरकुल योजना व संजय गांधी निराधार योजनेची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, गावरस्ता अतिक्रमण झाले असल्याने ते काढून टाकाव्यात तसेच गावातील मंदिराचे अर्धवट राहिलेले काम येत्या मे पर्यंत पुर्ण करण्यात येईल. या गावासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठयाची  योजनेसाठी ३५ लाखाची निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली. या गावातील विंधन विहीरी गावरस्ता, हातपंप नादुरुस्त विंधन विहीरींची  त्वरीत दुरुस्ती करावी व आवश्यक तेथे तात्पुरती नळ योजनेची कामे हाती घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिल्या.
 
Top