सोलापूर : महाराष्ट्राला प्रतिष्ठा देणा-या सहकार क्षेत्रात सहकार कायदयातील
घटना दुरुस्तीमुळे सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता येईल. असे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दि बारामती कोऑपरेटीव्ह बँकेचा नुतन वास्तू स्थलांतर शुभारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपिठावर महापौर अलका राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, सर्वश्री आमदार बबन शिंदे, दिलीप सोपल, दिलीप माने, दिपक साळुंखे, उपमहापौर हारुण सय्यद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, बँकेचे चेअरमन श्रीकांत सिकची उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्राने सहकार कायद्यात केलेली घटना दुरुस्ती मंजुर होण्याविषयी प्रयत्न केला जाईल. तत्पुर्वी राज्यपालांच्या सहीने या संबधात एक अध्यादेश काढण्यात आला असून हया घटना दुरुस्तीमुळे सहकार क्षेत्रात अनेक सकारात्मक व पारदर्शक बदल होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येणा-या अर्थसंकल्पात ग्रामीण व शहरी भागातील गरजा लक्षात घेऊन गोरगरिबांना दिलासा देण्यात येईल असेही ते म्हणाले.
जिल्हा सध्या भीषण दुष्काळाला तोंड देत असून चारा डेपो, पिण्याचे पाण्याचे टँकर्स आणि नरेगातून शक्य तेवढी कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या पार्श्चभुमिवर शहराचा विकास व्हावा याकरीता सहकार क्षेत्राने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांना सुविधा देणा-या सहकारी बँका निर्माण होण्याची आज गरज असल्याचे ते म्हणाले. शहरातील धनीकांनी दुष्काळी कामासाठी मदत करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक सिकची यांनी तर आभार भापकर यांनी मानले. कार्यक्रमास अनेक पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.