नळदुर्ग -: मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्या यात्रेत वीजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या नळदुर्ग येथील महात्मा गांधीनगर येथील रहिवासी महादेव नारायण कोकणे व वसंतनगर येथील संतोष दासू चव्हाण यांच्या घरी जाऊन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना दिलासा देवून त्यांचे सांत्वन केले. चव्हाण यांनी मृत पावलेल्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय कुटूंब योजनेअंतर्गत त्यांचे वारस, नातेवाईकांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश, वीज वितरण कंपनीकडून प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश व मैलारपूर खंडोबा मंदिर समितीतर्फे प्रत्येकी कुटुंबीयांना मदत म्हणून ११ हजार १ रुपये रोख रक्कम देवून त्यांना मदतीचा हात दिला.
यावेळी तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसीलदार व्ही. एल.कोळी, नळदुर्गचे नगराध्यक्ष शब्बीर सावकार, शहाबाज काझी, जि.प. सभापती कृषी सभापती पंडित जोकार, मंडल अधिकारी एल. एस. गायकवाड, वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अधिकारी पी. पी. बिच्छल, सहाय्यक अभियंता ए. डी. कांबळे, खंडोबा मंदिर समितीचे संचालक अशोक मोकाशे, तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे सदस्य, महिला, गावकरी उपस्थित होते.