नळदुर्ग -: राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांबाबत नळदुर्ग येथे नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे हाच सध्या शासनाचा आणि प्रशासनाचा अग्रक्रम असल्याचे प्रतिपादन ना. चव्हाण यांनी केले.
नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, तहसीलदार व्ही. एल. कोळी, नगराध्यक्ष शब्बीर सावकार, शहबाज काझी, जि.प. सभापती जोकार, मंडळ अधिकारी एल. एस. गायकवाड, वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अधिकारी पी. पी. बिच्छल, सहाय्यक अभियंता ए. डी. कांबळे, तालुका कृषी अधिकारी जाधव, लोकप्रतिनिधी, नगर परिषदेचे सदस्य, महिला , गावकरी उपस्थित होते.
ज्या विहिरींना पाणी आहे तेथून पाईप टाकुन पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेउन गावातील उपलब्ध असणारे पाणी जनतेस देण्यासाठी जे हातपंप नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करुन घेणे, ज्या विहिरींना पाणी आहे तेथुन पाईप टाकुन पाणी गावात आणून जनतेस उपलब्ध करुन देणे, तलाव, विहिरींमधील गाळ काढणे व नविन विहिरी घेणे याबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. टंचाईसंदर्भातील कोणतेही निर्णय प्रलंबित ठेवू नयेत, ते तातडीने मार्गी लावावेत, जेणेकरुन नागरिकांना या परिस्थितीत दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना, गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले.