उस्मानाबाद -: कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील ४० पशुवैद्यकिय दवाखान्याअंतर्गत ४० गावे दत्तक घेण्यात आली असून या गावात आधुनिक तंत्राने पशुपालन करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जाणार असून  दि. १२, १३, १४ व २१ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्याबाहेर सहलीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
    सहलीत उस्मानाबाद तालुक्यातील जवळा, दुधगाव, हिंगळवाडी, तोरंबा, तडवळा, वाघोली, विठलवाडी, अनसुर्डा, सोनेगाव, जुनोनी, तुळजापूर तालुक्यातील चिवरी, शहापूर, कोरेवाडी, काटगाव, सारोळा, हिप्परगाताड, वडगाव, कामठा, माळुंब्रा, सलगरा म, उमरगा तालुका - कवठा, कसगी, आलूर, डिग्गी, एकुरगा, कळंब तालुक्यातील वाघोली, कळंब, मलकापूर, पानगांव, मस्सा-खंडेश्वरी, वडगांव, भूम तालुका- पखरुड, हिवरडा, राळेसांगवी, दुधोडी, चुंबळी, कोकरवाडी, बंगाळवाडी, लोणी, शेंडी तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा, लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, मुर्शदपूर, धानोरी या गावातील पशुपालकांचा सहलीत समावेश राहणार आहे.
        या सहलीत निकृष्ट चारा सकस करणे, जनावरांचे मलमुत्र व वाया गेलेला चारापासून उत्कृष्ट खत निर्मिती करणे, गांडुळ व बायोइकॉनॉमिक्स तंत्राचा वापर, जिवाणु संवर्धनाचा वापर आदिचे प्रत्यक्षीके दाखवून प्रशिक्षण देण्यात येतील. याशिवाय इतर जिल्हयानी दुग्धव्यवसायात केलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी जवळपास तीनशे ते पाचशे शेतकरी व पशुपालक यात सहभागी करुन घेण्यात येतील.
           तसेच  मुक्त पशुसंचार गोठापध्दती, मुरघास प्रकल्प, दुध प्रक्रिया केंद्रे, संस्थेचे कामकाज आदिची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.पशुपालक मंडळाची  धर्मादाय आयुक्त,उसमानाबाद यांचेकडे नोंदणी करणे, जंतनाशक, लसीकरण, गोचिड निर्मूलन, वंधत्व निवारण,औषधोपचार शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. इच्छुक पशुपालकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top