उस्मानाबाद -: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर,के. ए.तडवी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयात शिवजयंती साजरी
येथील जिल्हा माहिती कार्यालयातही आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.