सोलापूर -: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2013 या दिनांक 21 फेब्रुवारी 26 मार्च या कालावधीत एकूण 206 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे, परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंदाच्या परिसरात प्रवेश करण्यास पाबंद  करणे, तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स, इमेल, रंडीओ, इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल), संगणक, गणनायंत्र (कॅलक्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवू नये आणि सर्व संबंधित शासकी अधिकारी अणि कर्मचारी यांना त्यांच्या परीक्षेशी संबंधित कर्तव्य चोखपणे आणि कोणताही अडथळा अथवा उपद्रव न होता बजावता यावा म्हणुन अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी परीक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम  144 लागु  केले आहे.
    या प्रतिबंधात्मक आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,  परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य  व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे इत्यादी माध्यमे बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात  मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ईमेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यात मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यसाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेश मनाई राहील. परीक्षेसी संबंधीत नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल, केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमुण केलेले अधिकारी/कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/शिक्षक/कर्मचारी आणि उमेदवार यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील. इतरांना (उमेदवारांच्यानातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. परीक्षा केंद्राच्या 10 मीटरच्या आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबंधित अधिकारी/कर्मचारी आणि परीक्षार्थी सोडून कुणालाही प्रवेश असणार नाही.
    हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याबाबत त्यांच्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. तथापि, भ्रणध्वनीचा वापर केवळ केंद्र संचालक आणि दक्षता/बैठे पथक यांनाच करता येईल. इतर सर्वांना भ्रमणध्वनी नेण्यास बंदी असेल. हे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या रोजी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रत्येक पेपरच्या एक तास अगोदर व एक तास नंतर (पोलीस आयुक्तालय सोलापूर हद्द वगळून) दि. 21.2.2013 ते 9.3.2013 पर्यंत लागू राहतील.
 
Top