सोलापूर : अनुजाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या ५ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती व परीक्षा फी चे अर्ज ऑनलाईन भरण्यची अंतिम मुदत दि. १६ फेब्रुवारी २०१३ आहे. या मुदतीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील सर्व मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावेत. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक हे सर्वस्वी जबाबदार राहतील असे सुनिल खमितकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.