उस्मानाबाद : व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. वैयक्तीक जीवनात पुढे जात असताना समाजकार्याचा विसर पडू देऊ नका. शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करुन व्यसनमुक्त समाज तयार करा, असा सल्ला पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी आज दिला.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६३७ वी सार्वजनिक जयंती उत्सव व युवक-युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आमदार बबनराव घोलप, आमदार ज्ञानराज चौगुले, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, ब्रिजलाल मोदाणी, लक्ष्मण सरडे, भाऊसाहेब उंबरे, धनंजय राऊत, जिल्हाध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक नितीन शेरखाने, अशोक लामतूरे, अंबादास गवळी, सुरेखाताई लामतुरे, सुरेश शेरखाने, राजाभाऊ शेरखाने, वंदनाताई शेरखाने, दादासाहेब वानखेडे, सिध्दार्थ बनसोडे, विजयकुमार शेवाळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र तुंदारे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, समाजाच्या प्रगतीसाठी संतानी दिलेल्या विचारधारेनुसारच समाज सुधारण्याचे कार्य केले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी समाज बांधवानी त्यांना सहकार्य करावे. महिला पुढे कशा येतील यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. भविष्यात शिक्षणाच्या माध्यमातून निर्व्यसनी पिढी निर्माण करण्याचे कार्य समाजघटकातील व्यक्तींकडून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले की, संतांची शिकवण घराघरापर्यंत पोहचवावी व दुर्बल घटकांची उन्नत्ती साधली तरच संत रविदास महाराजांची खरी जयंती साजरी होईल.
सुरुवातीला पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी डी.एन.सूर्यवंशी व एम.डी.देशमुख यांचे समाज प्रबोधनपर व्याख्याने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर प्रास्ताविक चंद्रहार क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमात संतोष वाघमारे, सत्यजित कसबे, शोभाताई निसूरे, सुरेखाताई लामतुरे आदिंनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील चर्मकार महासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकारणीचे सदस्य, महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.