बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -:  येथील मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त व्याख्यान व पोवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी रोजी कसबा पेठेतील बेदराई गल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता जेष्ठ इतिहास तज्ञ अरूण घोडके यांचे शिवपुत्र शुंराजे या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता सिव्हील इंजिनियर स्निग्धा तोडकर हिचा शाहिरी दौलत (पोवाडा) होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण मंडळाचे माजी सभापती पांडुरंग गव्हाणे भूषविणार आहेत. यावेळी सुब्राव पवार, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा ला घ्यावा असे आवाहन मंडळाचे भैय्या गव्हाणे व उमेश काळे यांनी केले आहे.
 
Top