बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विश्वेश्वर सहकारी बँक लि. पुणेच्‍या बार्शी शाखेने अल्पावधीतच 100 कोटींच्‍या व्‍यवसायाचे उददीष्ट पूर्ण केल्‍याची माहिती नूतन संचालक नंदकुमार होनराव यांनी दिली.
     बार्शीतील नागरिक, ग्राहक, ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांनी बँकेवर दाखिवलेल्‍या विश्वासामुळेच हे शक्‍य झाल्‍याचे शाखाधिकारी अनिल खजानदार यांनी म्हटले.
     मागील 14 वर्षांपासून बार्शीतील शाखा कार्यरत असून बँकेत आजपर्यंत 10 हजार 400 बचत खाती आहेत. बँकेला आयएमएस कोड मिळाला असून आरटीजीएस व एनईएमटी ह्या दोन्ही सेवा कार्यरत आहेत. ह्या सेवेचा लाभ व्‍यापारी व ग्राहकांना होत आहे. मागील दोन वर्षांत बँकेने 12500 जणांची पॅनकार्ड काढून दिली आहेत.
     लवकरच बार्शी शाखा नेहमीच्‍या प्रतिभेप्रमाणे नॉन ओव्हरड्यू होत असून बॅकेचे शाखा व्‍यवस्थापक खजानदार, महाले, खरे, गोटे, जेधे, गुडे, तालिकोटी, शिंदे, शिराळ, आंधळकर, बनसोड, तुपकर, गुळवे, सौ. महाजन हे संघटीतपणे कार्यरत आहेत.
     ग्राहकांसाठी लखपती बना ही योजना सुरु केली आहे. याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन बँकेच्‍यावतीने करण्‍यात आले. अधिक माहितीसाठी 9881909708 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 
Top