उस्मानाबाद :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात तात्पुरत्या नळ योजना, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहीरी, जुन्या विहिरींची विशेष दुरुस्ती अशा कामांसाठी जिल्हा प्रशासनाने 2 कोटी 92 लाख रुपयांच्या कामास प्रसासकीय मान्यता दिली आहे.
    जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी या कामांसाठी तालुकानिहाय प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यासाठी या विविध 208 कामांसाठी 66 लाख 50 लाख, तुळजापूर तालुक्यासाठी 48 कामांसाठी 69 लाख 96 हजार, उमरगा तालुक्यासाठी 48 कामांसाठी 22 लाख 13 हजार,  लोहारा- 8 कामांसाठी 6 लाख 78 हजार, भूम- 77 कामांसाठी 43 लाख 61 हजार, कळंब- 64 कामांसाठी 57 लाख 97 हजार, परंडा- 14 कामांसाठी 13 लाख 87 हजार आणि वाशी तालुक्यासाठी 24 कामांसाठी 11 लाख 45 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.        
 
Top