![]() | |
अर्थ उफाडे या सहा महिन्याच्या चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक आहे |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- कोल्हापूरहून परभणीकडे निघालेल्या ऊस तोड कामगारांच्या ट्रॅक्टरला ट्रान्स्फॉर्मर घेऊन निघालेल्या ट्रकची धडक बसल्याने 25 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील लहान चिमुरड्यासह तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
यातील अधिक माहिती अशी की, बुधवार दि. 20 मार्च रोजी रात्री 7 च्या सुमारास बार्शी कुर्डूवाडी रोडवर तावरवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल परागजवळ कुर्डूवाडीकडून बार्शीकडे निघालेल्या ट्रॅक्टरला बार्शीकडून कुडूवाडीकडे निघालेल्या मालट्रकने धडक दिली. यात पार्वती उफाडे (वय 50), महादेव मेखराम उफाडे (वय 22), चंद्रकला रामचंद्र खिलारे (वय 45), दामिनी भागवत घुगे (वय 28), अशोक नारायण काळे (वय 40), उर्मिला मारुती कांबळे (वय 30), लक्ष्मी दिलीप घुगे (वय 25), विठ्ठल भेखराम उखाडे, विकास कांबळे, सुमन कांबळे, मंगल काळे (सर्व रा. मुदगल), राधा खंदारे (रा. आवरगाव), पार्वती उफाळे (रा. पोडूळ), अनिल खंदारे (रा. आवरगाव) महादेव उफाडे (रा. पोंडूर) व लहान चिमुरडा अर्थ विठ्ठल उफाडे (वय 6 महिने रा.पोंडूळ ता.मानवत जि.परभणी) यांच्यासह सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.
यातील महादेव उफाळे, चंद्रकला खिलारे व चिमुरडा अर्थ यांची प्रकृती चिंताजनक आहे. सदरच्या अपघातानंतर इंडियन रेडक्रॉस, जीवन ज्योत संघटना, बार्शीतील पोलिस उपाधिक्षक, पोलिस निरीक्षक यांच्या पथकासह जवळच्या ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत कार्य केले. जगदाळे मामा रुग्णालयातील डॉ. बुरगुटे व सहकार्यांनी तातडीने उपचार सुरु केले.