बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- एका अज्ञात चोरट्याने 4 ठिकाणी घरफोडी करुन सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नारी (ता. बार्शी) येथे बुधवार दि. 20 मार्च रोजी रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहेबराव गुंडिबा यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पांगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी साहेबराव बागल यांच्या राहत्या घरी बंद घराचे कुलूप तोडून दरवाज्याच्या कडीकोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करुन डब्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम रुपये 50 हजार व दोन तोळ्याचे दागिने. त्यामध्ये अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, अर्धा तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे बोरमाळ, तीन ग्रॅमचे कर्णफुले (झुबे), एक ग्रॅमच्या रिंगा असा मिळून 47 हजार 500 व रोख रक्कमेसह एकूण 97 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्याने घेवून पोबारा केला. त्याचबरोबर बालाजी सुरवसे, विनोद कदम, माणिक इंगळे यांच्याही घरातील चोरी झाले असल्याचे बागल यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
एकाच दिवशी खेड्यामध्ये 4 घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याबाबत पोलिसांत भादंवि 457, 380 अन्वये गुन्हा नोंद झाला असून, याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे करीत आहेत.