बार्शी -: पानगाव (ता. बार्शी) जवळ पानगावपासून 2 किमी अंतरावर सायंकाळी 6 च्या सुमारास झालेल्या अपघातात सुनिक आण्णासाहेब कानगुडे वय 40 रा.पानगाव यांचा मृत्यू झाला. या अपघातास जबाबदार असलेल्या सुमोचा चालक व त्याचा सहाय्यक फरार झाले आहेत.
यातील अधिक माहिती अशी की, कानगुडे हे दुचाकीवरुन आपल्या शेतातून घरी परतत असतांना पाठीमागून येणार्या सुमो क्र.एम.एच.13 बी. 2744 या वाहनाने धडक दिल्याने बाजूला पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली व जागीच मृत्यू झाला. सदरच्या अपघातानंतर चालक व त्याचा साथीदार पळून गेले असून सदरच्या अपघाताची नोंद करण्याचे काम वैराग पोलिसांत उशीरापर्यंत सुरु होते. कानगुडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुली, 1 मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.
तर कांदलगांव (ता. बार्शी) येथील पांडूरंग ज्ञानदेव फुरडे वय 48 हे दुचाकीवरुन सायंकाळी 6 च्या सुमारास आपल्या गावाकडे निघाले असतांना अचानक वाहनाचा ताबा सुटल्याने खाली पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.