नळदुर्ग -: तिरट नावाचा जुगार खेळताना विशेष पथकाने अचानक छापा मारुन सुमारे 7 हजार 500 रूपयेचा मुद्दमाल जप्त केल्याची घटना ही घटना अणदूर (ता. तुळजापूर) येथे बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जुगारींना ताब्यात घेतले आहे.
अतुल भारत धोंगडे, विनोद कमलाकर पाटील, चरणसिंग विठ्ठलसिंग ठाकूर, उमाकांत रमेश मुळे (सर्व रा. अणदूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगा-यांचे नाव आहे. यातील चौघे हे अणदूर बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळत होते. याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळताच पथकातील दीपक कुलकर्णी व त्यांच्या सहका-यांनी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अणदूर या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, मोबाईल असे सुमारे 7 हजार 480 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात वरील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.