मुंबई -: जीवसृष्टीचा आधार असलेल्या वनांना जनाधार देण्याची आत्यंतिक गरज लक्षात घेऊन, जागतिक वनदिनी वनांचे संवर्धन करण्यासाठी सक्रीय योगदान देण्याचा आपण निर्धार करुया, असे आवाहन वने राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केले आहे.
21 मार्च या जागतिक वन दिनानिमित्ताने वने राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
भास्कर जाधव आपल्या संदेशात म्हणतात, पर्यावरणाच्या संतुलनात असलेले वनांचे अपरिमित आणि अमूल्य योगदान सर्वांना पटलेले आहे. लोकांसाठी व उद्योगधंद्यांसाठी वने जीवनाधार ठरली आहेत. तथापि, वनक्षेत्रामध्ये घट दिसत असून त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
जीवसृष्टीच्या आधाराचे जतन आणि पुनर्वसन करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड अभियानात वन विभाग आपली जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. वन्यजिवांना निवारा देण्यासाठी राज्यातील संरक्षित क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय गावांच्या प्रगतीशील पुनर्वसनाच्या कामाला गती देण्यात आली आहे. लोकोपयोगी योजनांच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष लोकसहभागाची बाब ओळखून अशा योजनांची जडण-घडण, लोकहित तसेच निसर्ग केंद्रीत ठेवून करण्यात आली आहे.
वन विभागाने स्वीकारलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन आणि निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत पर्यावरण पुरक लोकसहभागाला विशेष स्थान देण्यात आले आहे. वनाधारित गरजांसाठी वनांवर प्रामुख्याने अवलंबून असलेल्या गावांच्या विकासाला वनेच महत्त्वाचा आधार ठरत आहेत, असेही श्री. जाधव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.