बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील अवैध धंद्यांविरोधात आजपर्यंत अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्‍यांनी सदरच्या प्रकाराला बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापपर्यंत कोणालाही यश मिळाले नाही. अनेकांनी हात टेकले तिथे सुवर्णा शिवपुरे या केवळ एकट्या रणरागीनीने कंबर कसली आहे. शुक्रवार दि. 8 मार्च रोजी महिलादिनादिवशी पोलिस उपअधिक्षक कार्यालयाजवळ त्या लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत.
     बार्शीत अनेक ठिकाणी लहान मुलांना अंध अपंगांनादेखिल विचारा अमक्याचा क्लब कुठे आहे, तमक्याचा दारुचा गुत्‍ता कुठे आहे त्यांच्याकडून क्षणाचाही विलंब न लावता संबंधितांकडून सांगण्‍यात येते.
     बार्शीतील राजरोसपणे सुरु असलेल्या मटका, विना परवाना दारु विक्री, जुगार इत्यादी सर्वप्रकारच्या अवैध धंद्यांना तेजीचे दिवस असून गुंडगिरीची मोठी दहशत असल्याने कोणीही त्यांच्याविरोधात तक्रार देण्याचे धाडस करत नाही. तसेच पोलिस आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याने त्यांना अशा प्रकारचे धंदे कुठे सुरु आहेत हे बिलकुल माहितच नसल्याने कायमस्वरुपी नाही किमान सणा वाराला देखिल या धंद्यांत व्यत्यय येत नाही.
     तक्रार देणार्‍याचे नाव गुप्त ठेवायचे तर सोडाच परंतु या उलट ज्यांची तक्रार आहे अथवा अशा प्रकारला ज्याने समोर आणायचा प्रयत्न केला त्याचे घर त्या गुंडांना दाखवून काट्याने काटा काढण्याचे प्रकार होत आहेत. तुमचे तिकडे काही होवो आमचे काय ते बोला? अशी चर्चानागरिकात होत आहे.
 
Top