उस्मानाबाद -: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी येथील पुष्पक मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार बसवराज पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार डॉ.पदमसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हटटे यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यास जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, महिला सदस्य, महिला सरपंच, उपसरपंच, महिला बचत गटाच्या सदस्य आदी उपस्थित राहणार असून या मेळाव्यास महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास यांनी केले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान व निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून अनुक्रमे महिला सक्षमीकरण व स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, स्त्री गर्भलिंग निदान चाचणी, स्त्री व बालकांचे कुपोषण, बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायदा व महिलांचे अधिकार व पाणी व स्वच्छता कार्यक्रमात महिला सहभागाची आवश्यकता. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गरिबी निर्मुलन व महिला सक्षमीकरण व विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.