सोलापूर -: मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांचा सोलापूर जिल्हा दौरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण हे  दि. 2  मार्च 2013 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे राहील.
    शनिवार दि. 2 मार्च रोजी सांयकाळी 5.50 वाजता अकोला येथून विमानाने सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमस्थळ येथे आगमन व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सोलापूर शहर रस्ते विकास प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 7.00 वाजता कार्यक्रमस्‍थळ येथून शासकीय मोटारिने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सायंकाळी 7.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आगमन. सायंकाळी 7.15 वाजता पाणी टंचाई दुष्काळ बाबत बैठक (जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर) सायंकाळी 8.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन. सायंकाळी 9 ते 9.30 वाजता शिष्टमंडळासाठी राखीव. रात्रो 9.30 ते 10  वाजता राखीव.. रात्रौ शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम.
 
Top