उस्मानाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ तसेच उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने दि. 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव-2013 उपक्रमात तब्बल 3 लाख रुपयांची पुस्तक विक्री झाली. तीव्र पाणीटंचाई, उन्हाचा वाढता कडाका आणि परीक्षेचा हंगाम असतानाही उस्मानाबादकर रसिक वाचकांनी ग्रंथ प्रदर्शनास चांगला प्रतिसाद दिला.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगर सांस्कृतिक सभागृहात हा ग्रंथोत्सव पार पडला. पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, परभणी,सोलापूर, लातूर, औसा तसेच स्थानिक विक्रेते-प्रकाशक सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी वाचकांच्या मिळालेल्या काहीशा थंड प्रतिसादामुळे पुस्तक विक्री होईल की नाही याची शंका विक्रेते व प्रकाशकांना होती. मात्र नंतरच्या दोन दिवसात उस्मानाबादकर रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाने ही शंका फोल ठरली. जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर, जिल्हा कोषागार अधिकारी राहूल कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांच्यासह विविध शासकीय अधिकारी ,कर्मचारी उस्मानाबाद शहर व जिल्हयातील साहित्यीक, रसिक वाचक, पत्रकार आदिंनी या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. याचबरोबर विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनास भेट देवून पुस्तक खरेदी केली.