उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्यावतीने येत्या 3 मार्च रोजी येथील जिल्हा न्यायालयात तसेच प्रत्येक तालुका न्यायालयात महा-लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांच्या वेळेत आणि पैसा वाचवावा या हेतूने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश पी. बी. मोरे यांनी केले आहे.
या न्यायालयात प्रलंबित असलेले मोटार अपघात, कामगार नुकसान भरपाई, दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, आदि तडजोडीने मिटविण्यासाठी या महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित पक्षकारांनी त्यांचे वरीलपैकी प्रलंबित असणारी प्रकरणे या महा-लोकअदालतीमध्ये ठेवून मिटवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.