उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेले माहे एप्रिल ते जुन 2013 या कालावधीमध्ये मुदती संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणूकां घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिले आहे.
    मतदार यादी ग्राहय धरण्याचा दिनांक 15 जानेवारी 2013, निवडणूकीची नोटीस 2 मार्चला प्रसिध्द, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक दि. 3 ते 14 मार्च,2013 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी  3 वाजेपर्यंत, ( दि. 10 मार्च रोजी सार्वजनिक सुटटी असल्याने) या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची  छाननी दिनांक 15 मार्च रोजी  सकाळी 11 पासून, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च सकाळी 11 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.
     निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दिनांक 18 रोजी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदान  दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेणयात येईल. मतमोजणी दिनांक  जिल्हाधिकारी  यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. त्यानुसार राहील. 30 मार्च ही राहील.  मतदान  झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.  


ग्रामपंचायत निवडणूकांसाठी गटविकास अधिकारी आचारसंहिता प्रमुख 
उस्मानाबाद :- जिल्हयात माहे एप्रिल ते जुन 2013 या कालावधीत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणूक मुदती संपणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूकीचा  कार्यक्रम घोषित राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. या निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोटरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आचारसंहिता प्रमुख म्हणून संबंधित तालुक्याचे सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा,कळंब, भूम, परंडा आणि वाशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
        संबंधित आचारसंहिता प्रमुखांनी राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक, सूचनेनुसार, निर्देशानूसार कार्यवाही करावी व संबंधित तहसिलदारांना निवडणूक कामी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले आहे. 

 
Top