उस्मानाबाद :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, उस्मानाबादकडील करार पध्दतीने कनिष्ठ अभियंता व लिपीक टंकलेखक या पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदर पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात असून लेखी या परीक्षेसाठी पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच www.Osmanabad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      या यादीबाबत उमेदवारांच्या काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले आक्षेप दि. 6 मार्चपर्यंत कार्यालयात लेखी स्वरुपात पाठवावेत. कनिष्ठ अभियंता पदासाठी यादीतील रकाना क्रं 15 मध्ये व लिपीक टंकलेखक पदासाठी- रकाना क्रं 17 मध्ये अपात्र कारण दर्शविण्यात आले आहे. आक्षेप प्राप्त झाल्यानंतर यंत्रणास्तरावर आक्षेपाची तपासणी होईल, याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.   
 
Top