उस्मानाबाद :- पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी यांनी आज उजनी पाणीपुरवठा यजनेच्या कामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. बार्शी तालुक्यातील खांडवी येथे जाऊन त्यांनी या योजनेतील कामांबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली.
      शुक्रवार दि. १ मार्च रोजी सकाळी पालकमंत्री चव्हाण यांनी उस्मानाबादहून खांडवी येथे जाऊन त्याठिकाणी उजनी योजनेच्या कामाबाबत संबधितांशी चर्चा केली. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, अप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे यांच्यासह नगर परिषद, पाणीपुरवठा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
      पालकमंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सध्याच्या पाईपलाईनमधुन येणा-या पाण्याविषयीची माहिती घेतली. ज्याठिकाणी गळती होत आहे त्याठिकाणी जाऊनही चव्हाण यांनी पाहणी केली. उस्मानाबाद शहर तसेच आसपासच्या परिसरासाठी उजनी पाणीपुरवठा योजना अतिशय महत्वाची आहे. त्यादृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करुन ही योजना लवकरात लवकर पुर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात उस्मानाबाद शहरात पाणी पोहोचावे यासाठी सर्व तांत्रिक अडचणी तात्काळ दुर करण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिका-यांना केल्या.
 
Top