उस्‍मानाबाद -: शिवजयंतीनिमित्‍त घेण्‍यात आलेल्‍या अभाविपच्‍या रक्‍तदान शिबिरास उस्‍मानाबादमध्‍ये मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला. ५३ रक्‍तदात्‍यांनी याप्रसंगी रक्‍तदान केले.
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे एक सामाजिक उपक्रम म्‍हणून रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. रक्‍तदान शिबिराचे उदघाटन डॉ. सतीश पवार यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्‍हणून विधीमहाविद्यालयातील प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करुन उदघाटन करण्‍यात आले. रक्‍तदान शिबिरास शहरातील के.टी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, परमहंस महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालयासह शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी उत्‍र्स्‍फुतपणे रक्‍तदान केले.
 
Top