उस्मानाबाद :- शासनाने सन 2013 वर्षासाठी राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार व राष्ट्रीय बाल शौर्य 2012-13 पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून दरवर्षी ज्या मुलानी स्वत:चे जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविले अशा अतुलनीय धाडसाबददृल पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव 11 मार्चपर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु. पी. बिरादार यांनी केले आहे.
सदर पुरस्काराची नियमावली व केंद्र शासनाचे वेबसाईट www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रस्ताव परिपुर्ण चार प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, प्रशासकीय इमारत खोली क्रं 15 तळमजला, उस्मानाबाद या कार्यालयात मुदतीतच सादर करावे. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.