उस्मानाबाद :- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात फळबागा व भाजीपाला पिक जगविण्यासाठी येत्या 7 मार्चपर्यंत कृषी विभाग आणि आत्माअंतर्गत  जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि फळबागा व भाजीपाला पिक जगविण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञांनी अनुषंगीक उपाययोजना सूचविल्या आहेत. त्याची माहिती शेतक-यांना व्हावी यासाठी  या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित तालुका कृषी अधिका-यांमार्फत  प्रक्षेत्र भेटी, शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, चर्चासत्रे अशा कार्यक्‌रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात येणार आहे. या कार्यक्‌रमात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे  प्रकल्प संचालक व्ही.डी. लोखंडे  यांनी केले आहे.
      शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी मल्चिंग, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मडका सिंचन, बाष्मीभवन टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत त्याठिकाणी प्रक्षेत्र भेटीही आयोजन करण्यात आले आहेत.         
 
Top